औरंगाबाद: दारूच्या एका ओल्या पार्टीमध्ये मदमस्त होऊन लैला मै लैला या हिंदी चित्रपटातील गाण्यावर नाचताना एका खासदार पुत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका खासदारपुत्राचा एक व्हिडिओ चंगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये काळे शर्ट, पांढरी पॅन्ट ,डोक्यावर टोपी घातलेला खासदार पुत्र लैला मै लैला या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील आयटम साँग वर मदमस्त होऊन नाचताना दिसत आहे. या पार्टी दरम्यान व्हिडिओ मध्ये तीन ते चार टेबल दिसत असून पार्टीत तरूण महिला-पुरुषांचा समावेश आहे. टेबलावर दारूच्या बाटल्या, दारूने भरलेले ग्लास, दिसत असून चित्रपटातील आयटम साँग मधील नृत्याचे सादरीकरणच खासदारपुत्र करीत असल्याचे दिसते. एका पक्षात काही काळापूर्वीच प्रवेश केलेला एक प्रतिष्टीत व्यक्ती मोबाईल द्वारे हे चित्रीकरण करीत आहे. या व्हिडिओची मोठी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियातून टिकेची झोड उठली आहे. नाचणे तरुणांचे व्यक्तिगत आयुष्य जीवन जरी असले तरी एका खासदार पुत्राने अशाप्रकारे दारू पार्टी मध्ये नाचणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहेत.









